
प्रस्तावना
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या रजा घेण्याचा अधिकार आहे. मात्र, या रजा ठरावीक नियमांनुसारच मंजूर होतात. महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१” अंतर्गत रजा संदर्भातील सर्व महत्वाचे नियम आणि तरतुदी स्पष्ट केल्या आहेत. या लेखात आपण रजा नियम, त्यांच्या अटी, रजेचे प्रकार आणि रजेचे GR यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
रजा म्हणजे काय?
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२८) नुसार, सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यासाठी दिलेली परवानगी म्हणजे “रजा” होय.
अखंडित रजेची मर्यादा:
प्रकरण ३, नियम १६ नुसार, सतत पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी कोणतीही रजा मंजूर केली जात नाही.
रजेचे नियम: महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक
महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी हे आपल्या सेवा कालावधीत विविध कारणांसाठी रजा घेत असतात. परंतु रजा घेताना विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांचे मुख्य आधार आहे. या लेखात आपण रजा नियम, महत्वाच्या तरतुदी व रजेचे GR यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
रजा म्हणजे काय?
महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१, प्रकरण २, नियम ९(२८) नुसार, सक्षम प्राधिकाऱ्याने कामावर अनुपस्थित राहण्यासाठी दिलेली परवानगी म्हणजे “रजा” होय.
रजा मिळण्याच्या अटी:
रजा ही हक्क नसून, ती मंजूर करणे हा सक्षम अधिकाऱ्याचा अधिकार आहे.
लोकसेवेच्या निकडीमुळे रजा नाकारली किंवा रद्द केली जाऊ शकते.
लेखी विनंती वगळता, मंजूर रजेचा प्रकार बदलता येत नाही.
अखंडित रजेची मर्यादा:
प्रकरण ३, नियम १६ नुसार, सतत पाच वर्षांहून अधिक कालावधीसाठी कोणतीही रजा मंजूर केली जात नाही.
रजेचे नाव | किती दिवस | महत्वाचे नियम/शेरा |
अर्जित रजा (Earned Leave) | कमाल ३०० दिवस, एकावेळी १८० दिवस | वर्षातून २ वेळा (जनवारी, जुलै) १५ दिवस आगाऊ जमा |
अर्धपगारी रजा (Half Pay Leave) | वर्षाला २० दिवस | निलंबन काळ धरला जात नाही |
परिवर्तीत रजा (Commuted Leave) | अर्धपगारी रजेचे दुप्पट खर्ची | कमाल ९० दिवस |
अनिर्जित रजा (Leave Not Due) | संपूर्ण सेवा ३६० दिवस, एकावेळी ९० दिवस | वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक |
असाधारण रजा (Extraordinary Leave) | ६-१८ महिने | रजा खात्यावर शिल्लक नसल्यास, वैद्यकीय आधार आवश्यक |
प्रसूती रजा (Maternity Leave) | १८० दिवस | २ पेक्षा कमी अपत्य असल्यास; सरोगसी व दत्तकासाठीही विशेष तरतुदी |
गर्भपात रजा (Miscarriage Leave) | ६ आठवडे | वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक |
अपघाती/विशेष विकलांगता रजा | अपघात: २४ महिने, विकलांगता: १२० दिवस | कर्तव्य बजावताना झाल्यास |
रुग्णालयीन रजा | २८ महिने | कर्तव्य बजावताना आजार झाल्यास |
टी.बी./कर्करोग/कुष्ठरोग/पक्षाघात रजा | १२–२४ महिने | तीन वर्षांची सेवा आवश्यक |
अध्ययन रजा (Study Leave) | १२–२४ महिने | सेवा किमान ५ वर्षे; शिक्षणासंदर्भात |
निवृत्तीपूर्व रजा | १८० दिवस / २४ महिने | सेवा निवृत्तीच्या तारखेआधीच |
परिविक्षाधीन रजा | – | अधिक रजा घेतल्यास परीक्षाधीन कालावधी वाढवला जाऊ शकतो |
विशेष नैमित्तिक रजा | ४ ते २१ दिवस | कुत्रा चावा, नसबंदी, अपत्य नियमन इ. कारणांसाठी |
विशेष नैमित्तिक रजा:
कुत्रा चावा / नसबंदी / संतती नियमन इत्यादी कारणांकरिता ४ ते २१ दिवसांपर्यंत मिळू शकते. (वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक
निष्कर्ष:
शासकीय कर्मचाऱ्यांनी रजा घेताना संबंधित रजा नियम, GR व प्राधिकाऱ्याच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. योग्य प्रकारे अर्ज करून, गरज व नियम ओळखून रजा घेतल्यास प्रशासन व कर्मचारी दोघांचाही फायदा होतो.
महाराष्ट्र शासनाचा 2023 GR विकलांग अपत्य असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष बाल संगोपन रजा मंजूर करतो. पात्रता, अटी आणि विकलांगतेचे प्रकार जाणून घ्या. अधिक माहिती सखी खालील बटनावर क्लिक करा