राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR

राज्य शासकीय कंर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंबीयांना काही मदत व्हावी  आणि राजीनामा, मृत्यू , सेवोनिवृत्ती इ. कारणामुळे कर्मचाऱ्यांची  सेवा संपुष्टात आल्यास त्याला किंवा त्यांच्या कुटुंबाला काही ठोक रक्कम मिळावी अशा दुहेरी लाभासाठी विम्याचे स्वरक्षण देण्याची  तरतूद करणाच्या दृष्टीने राज्य शासनाने हि योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेली आहे.  राज्य शासन अत्यंत कमी खर्चाची व सर्वस्वी वर्गणीच्या स्वरुपाची अशी हि स्वावलंबी योजना आहे.   राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १ मे १९८२ पासून सुरू करण्यात आली आहे.  प्रस्तुत योजनेंचा तपशील वेगळ्या जोडपत्रात दिलेला आहे. ही योजना स्थायी राहील.

नामनिर्देशन 

राज्य शासकीय गट विमा योजनेच्या लाभासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला नामनिर्देशन करणे आवश्यक राहील. गट विमा योजनेचे नामनिर्देशन करण्यासाठी नमुना form खालीलप्रमाणे आहे. हा नमुना भरून व स्वाक्षरी करून कार्यालय प्रमुखामार्फत आपल्या सेवा पुस्तकात नोंद करणे आवश्यक आहे. 

गट विमा योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेला नामनिर्देशनाचा form

गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय 

१) शासन निर्णय दिनांक २६ एप्रिल १९८२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना १९८२ हि १ मे १९८२ पासून आमलात आली. यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते.

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये 
वर्ग – १ (अ)८० रुपये ८००००
वर्ग – २ (ब)४० रुपये ४००००
वर्ग – ३ (क)२० रुपये २००००
वर्ग – ४ (ड)१० रुपये १००००

२) शासन निर्णय दिनांक १४   फेब्रुवारी १९९०  नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना  यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते. सदर वर्गणीचे वाढीव दर १ जानेवारी १९९० पासून लागू करण्यात आले आहेत. 

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये  
वर्ग – १ (अ)१२० रुपये १२०००० 
वर्ग – २ (ब)६० रुपये ६००००
वर्ग – ३ (क)३० रुपये ३०००० 
वर्ग – ४ (ड)१५  रुपये १५०००

३) शासन निर्णय दिनांक २६ जुलै २००२  नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर खालील प्रमाणे. सदर दर 1 जानेवारी २००२ पासून लागू राहतील. 

वर्ग वर्गणीचे दर विमा स्वंरक्षण  रुपये 
वर्ग – १ (अ)२४० रुपये २४००००
वर्ग – २ (ब)१२० रुपये १२००००
वर्ग – ३ (क)६०रुपये ६००००
वर्ग – ४ (ड)३० रुपये ३००००

४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१०   नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर  खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १  जानेवारी  २०१०  पासून लागू राहतील.  शासन निर्णय ०२ ऑगस्ट २०१० रोजी निघाला असला तरी सुधारित दर 1 जानेवारी २०१० पासून लागू करण्यात आलेले आहेत. जानेवारी ते जुलै २०१० च्या गटविमा वर्गणीच्या फरकाची रक्कम ऑगस्ट २०१० च्या वेतनात वसूल करण्याचे आदेश आहेत. 

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये 
वर्ग – १ (अ)४८० रुपये ४८०००० 
वर्ग – २ (ब)२४० रुपये २४०००० 
वर्ग – ३ (क)१२० रुपये १२०००० 
वर्ग – ४ (ड)६० रुपये ६०००० 

५) शासन निर्णय –  गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६    नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर  खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १  जानेवारी  २०१६  पासून लागू करण्यात आले आहेत.

गट विमा योजना वर्गणी वाढ झाल्याचा शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०१६
गट विमा योजना शासन निर्णय ३० जानेवारी २०१६
वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये 
वर्ग – ३ (क)३६० रुपये ३६००००
वर्ग – ४ (ड)२४० रुपये २४००००

राज्य शासकींय गट विमा योजना चे सर्व शासन निर्णय खालीलप्रमाणे

Download करण्यासाठी खाली क्लिक करा 

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत