सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी? | Step by Step मार्गदर्शन

सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी .  शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवार्थ प्रणाली ( https://sevaarth.mahakosh.gov.in/ ) मधून भविष्य निर्वाह निधी (GPF) चे वार्षिक विवरणपत्र ऑनलाइन पाहण्याची / डाउनलोड करण्याची तसेच प्रिंट काढून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महालेखाकार कार्यालय (नागपूर / मुंबई) यांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी खाते तपशील सेवार्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिले असून, त्याच अनुषंगाने सेवार्थ प्रणालीमध्ये Employee Corner या विभागात ही सेवा देण्यात आली आहे.

या लेखामध्ये आपण सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी, Employee Corner कसा शोधावा, तसेच अडचण आल्यास काय करावे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

सेवार्थ मधून GPF Slip पाहण्याची सुविधा

सेवार्थ पोर्टलवर https://sevaarth.mahakosh.gov.in/ लॉग-इन केल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास स्वतःचे भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र (GPF Annual Statement) ऑनलाइन पाहता व डाउनलोड करता येते.

👉 ही सुविधा पूर्णतः ऑनलाइन असून
👉 कार्यालय स्तरावरून GPF Slip काढण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. म्हणजेच प्रत्येक कर्मचा-यास GPF स्लीप फक्त आपल्याच वैयक्तिक Login मध्ये लोगिन करून भविष्य निर्वाह निधी (GPF) चे वार्षिक विवरणपत्र ऑनलाइन पाहण्याची / डाउनलोड करण्याची तसेच प्रिंट काढता येते.

सेवार्थ मधून GPF  भ.नि.निधी. Slip कशी काढावी ? (Step by Step)

Step 1: सेवार्थ पोर्टलमध्ये लॉग-इन करा –

https://sevaarth.mahakosh.gov.in/ या लिंक वर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे screen दिसेल

  • आपला Sevarth ID आणि Password वापरून सेवार्थ प्रणालीमध्ये लॉग-इन करा.
सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी. login screen

Step 2: Employee Corner शोधा

  • लॉग-इन झाल्यानंतर Employee Corner या पर्यायावर क्लिक करा.
सेवार्थ मध्ये login केल्यावर View GPF slip screen अशी दिसेल

Step 3: View GPF Slip वर क्लिक करा

  • Employee Corner मध्ये View GPF Slip हा पर्याय निवडा.

Step 4: आवश्यक माहिती भरा (महत्वाची स्टेप)

येथे भविष्य निर्वाह निधीची माहिती भरताना खालील प्रमाणे तपशील सर्व CAPITAL अक्षरांत भरावेत :

Format :
 SerialNumber_GPFAccountNumber_YYYYMMDD_SevarthID

उदा.

  • Serial Number
  • (Underscore)
  • भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक
  • (Underscore)
  • जन्मतारीख (वर्ष-महिना-दिवस : YYYYMMDD)
  • (Underscore)
  • Sevarth ID

⚠️ सर्व माहिती CAPITAL LETTERS मध्ये भरणे अत्यंत आवश्यक आहे. नंतर Submit बटनावर क्लिक करा.

 

सेवार्थ मधून भविष्य निर्वाह निधी विवरण पत्र डाउनलोड करण्यासाठी.

Step 5: GPF Slip पाहा व डाउनलोड करा

वरील माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर
✔️ तुमचे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र (GPF Slip) स्क्रीनवर दिसेल.
✔️ तुम्ही ते डाउनलोड / प्रिंट करू शकता.

राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

GPF Slip दिसत नसेल तर काय करावे?

GPF Slip पाहताना काही तांत्रिक अडचण आल्यास खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा :

mdc.sevaarth@mahakosh.in

ई-मेलमध्ये खालील माहिती दिल्यास आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळेल

  • कर्मचारी नाव
  • Sevarth ID
  • महालेखाकार कार्यालय (नागपूर / मुंबई)
  • भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक
  • जन्मतारीख
  • सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (Scanned Copy)
  • Sevarth ID व Password

महत्वाच्या सूचना (Important Notes)

  • GPF विवरणपत्र प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतः सेवार्थ पोर्टलवरून काढणे बंधनकारक आहे.
  • कार्यालयाला GPF Slip काढण्याची कोणतीही सुविधा नाही.
  • त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपला Sevarth ID व Password Active ठेवणे आवश्यक आहे.

पुढील सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कृपया तो व्हिडिओ अवश्य पहावा.

निष्कर्ष (Conclusion)

सेवार्थ प्रणालीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र ऑनलाइन, सुरक्षित व सोप्या पद्धतीने पाहता येते.
वरील स्टेप्स योग्य प्रकारे फॉलो केल्यास कोणत्याही अडचणीशिवाय GPF Slip डाउनलोड करता येते.

शिवजयंती निमित्त अत्यंत प्रभावशाली ५ भाषणे एकाच ठिकाणी

छत्रपती शिवाजी महाराज : शिवजयंती विशेष ५ प्रभावी भाषणे

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजेच शिवजयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण जगात साजरी केली जाते.  छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी १६३० रोजी पुणे

Read More »
शिवजयंती विशेष प्रभावी 5 भाषणे

शिवजयंती विशेष : छत्रपती शिवाजी महाराजांवरील 5 प्रभावी व प्रेरणादायी भाषणे

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नसून भारतीय स्वातंत्र्य, स्वराज्य, प्रशासन, धर्मनिरपेक्षता आणि लोककल्याणकारी राजसत्तेचे प्रतीक आहेत. शिवजयंती च्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक

Read More »
जुनी पेन्शन योजना (OPS) अंतर्गत महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निश्चित पेन्शन, आजीवन सुरक्षा आणि कुटुंब संरक्षण दर्शविणारी साधी माहितीपर प्रतिमा

जुनी पेन्शन योजना 2026: शासकीय कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वी सेवेत असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी | GR कुटुंबासाठी मोठा दिलासा सुरक्षेची हमी

नमस्कार मित्रांनो. तुम्ही जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र शोधत असाल तर हे लेख तुमच्यासाठीच आहे. महाराष्ट्रातील लाखो शासकीय कर्मचारी निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्याची स्वप्ने पाहतात. पूर्वी जुनी

Read More »
NPS Withdrawal Process in Marathi explained

Guide to NPS Withdrawal Process in Marathi | नियम, प्रक्रिया

NPS Withdrawal Process in Marathi समजून घेणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण, निवृत्ती म्हणजे केवळ नोकरीचा शेवट नाही. ती एक नवीन आर्थिक टप्प्याची

Read More »
प्रसूती रजा नियम व वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती याबाबत महाराष्ट्र शासनाची अधिकृत माहिती दर्शविणारी इन्फोग्राफिक प्रतिमा

प्रसूती रजा : महाराष्ट्र शासनाचे नियम, सेवा अट रद्द | संपूर्ण माहिती २०२६

प्रसूती रजा ही महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केवळ रजा नसून एक मूलभूत हक्क आहे.मातृत्वाच्या काळात महिलांना मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक आधाराची गरज असते.म्हणूनच, महाराष्ट्र शासनाने प्रसूती

Read More »
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक लाभ दर्शवणारे फीचर इमेज – वेतन, पेन्शन, GPF, NPS, विमा व वैद्यकीय सुविधा

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व आर्थिक लाभ – एकाच लेखात संपूर्ण माहिती

प्रस्तावना महाराष्ट्र शासनाची नोकरी ही केवळ रोजगाराचे साधन नसून आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्याची हमी असते. शासकीय कर्मचाऱ्यांना नियमित वेतनाबरोबरच अनेक भत्ते, निवृत्ती

Read More »

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत