सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी . शासनाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सेवार्थ प्रणाली ( https://sevaarth.mahakosh.gov.in/ ) मधून भविष्य निर्वाह निधी (GPF) चे वार्षिक विवरणपत्र ऑनलाइन पाहण्याची / डाउनलोड करण्याची तसेच प्रिंट काढून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महालेखाकार कार्यालय (नागपूर / मुंबई) यांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे भविष्य निर्वाह निधी खाते तपशील सेवार्थ पोर्टलवर उपलब्ध करून दिले असून, त्याच अनुषंगाने सेवार्थ प्रणालीमध्ये Employee Corner या विभागात ही सेवा देण्यात आली आहे.
या लेखामध्ये आपण सेवार्थ मधून GPF Slip कशी काढावी, Employee Corner कसा शोधावा, तसेच अडचण आल्यास काय करावे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
सेवार्थ मधून GPF Slip पाहण्याची सुविधा
सेवार्थ पोर्टलवर https://sevaarth.mahakosh.gov.in/ लॉग-इन केल्यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्यास स्वतःचे भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र (GPF Annual Statement) ऑनलाइन पाहता व डाउनलोड करता येते.
👉 ही सुविधा पूर्णतः ऑनलाइन असून
👉 कार्यालय स्तरावरून GPF Slip काढण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. म्हणजेच प्रत्येक कर्मचा-यास GPF स्लीप फक्त आपल्याच वैयक्तिक Login मध्ये लोगिन करून भविष्य निर्वाह निधी (GPF) चे वार्षिक विवरणपत्र ऑनलाइन पाहण्याची / डाउनलोड करण्याची तसेच प्रिंट काढता येते.
सेवार्थ मधून GPF भ.नि.निधी. Slip कशी काढावी ? (Step by Step)
Step 1: सेवार्थ पोर्टलमध्ये लॉग-इन करा –
https://sevaarth.mahakosh.gov.in/ या लिंक वर क्लिक केल्यानंतर खालील प्रमाणे screen दिसेल
- आपला Sevarth ID आणि Password वापरून सेवार्थ प्रणालीमध्ये लॉग-इन करा.
Step 2: Employee Corner शोधा
- लॉग-इन झाल्यानंतर Employee Corner या पर्यायावर क्लिक करा.
Step 3: View GPF Slip वर क्लिक करा
- Employee Corner मध्ये View GPF Slip हा पर्याय निवडा.
Step 4: आवश्यक माहिती भरा (महत्वाची स्टेप)
येथे भविष्य निर्वाह निधीची माहिती भरताना खालील प्रमाणे तपशील सर्व CAPITAL अक्षरांत भरावेत :
Format :
SerialNumber_GPFAccountNumber_YYYYMMDD_SevarthID
उदा.
- Serial Number
- (Underscore)
- भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक
- (Underscore)
- जन्मतारीख (वर्ष-महिना-दिवस : YYYYMMDD)
- (Underscore)
- Sevarth ID
⚠️ सर्व माहिती CAPITAL LETTERS मध्ये भरणे अत्यंत आवश्यक आहे. नंतर Submit बटनावर क्लिक करा.
Step 5: GPF Slip पाहा व डाउनलोड करा
वरील माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर
✔️ तुमचे भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र (GPF Slip) स्क्रीनवर दिसेल.
✔️ तुम्ही ते डाउनलोड / प्रिंट करू शकता.
राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
GPF Slip दिसत नसेल तर काय करावे?
GPF Slip पाहताना काही तांत्रिक अडचण आल्यास खालील ई-मेल आयडीवर संपर्क साधावा :
mdc.sevaarth@mahakosh.in
ई-मेलमध्ये खालील माहिती दिल्यास आपल्याला त्यांच्याकडून मदत मिळेल
- कर्मचारी नाव
- Sevarth ID
- महालेखाकार कार्यालय (नागपूर / मुंबई)
- भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक
- जन्मतारीख
- सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (Scanned Copy)
- Sevarth ID व Password
महत्वाच्या सूचना (Important Notes)
- GPF विवरणपत्र प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतः सेवार्थ पोर्टलवरून काढणे बंधनकारक आहे.
- कार्यालयाला GPF Slip काढण्याची कोणतीही सुविधा नाही.
- त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपला Sevarth ID व Password Active ठेवणे आवश्यक आहे.
पुढील सविस्तर माहिती व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कृपया तो व्हिडिओ अवश्य पहावा.
निष्कर्ष (Conclusion)
सेवार्थ प्रणालीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीचे विवरणपत्र ऑनलाइन, सुरक्षित व सोप्या पद्धतीने पाहता येते.
वरील स्टेप्स योग्य प्रकारे फॉलो केल्यास कोणत्याही अडचणीशिवाय GPF Slip डाउनलोड करता येते.
गट विमा योजना नामनिर्देशनाचा नमुना form download करण्यासाठी येथे क्लिक करा
१) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ एप्रिल १९८२
२) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक १४ फेब्रुवारी १९९०
३) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ जुलै २००२
४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१०
५) शासन निर्णय – गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६

Cryptocurrency म्हणजे काय? फायदे, तोटे आणि भविष्यातील संधी – संपूर्ण मार्गदर्शक 2026
गेल्या काही वर्षांत जगभरात आर्थिक व्यवहारांची पद्धत मोठ्या प्रमाणात बदलली आहे. आज आपण मोबाईलवरून काही सेकंदांत पैसे पाठवू शकतो. याशिवाय, ऑनलाइन खरेदी, डिजिटल पेमेंट आणि

पर्सनल लोन कसे घ्यावे? व्याजदर, पात्रता, EMI व अर्ज प्रक्रिया | 2026 Guide
अचानक वैद्यकीय खर्च, मुलांच्या शिक्षणाची फी, लग्नाचा खर्च किंवा घरातील इतर आर्थिक गरज यांसाठी अनेकदा मोठ्या रकमांची आवश्यकता भासते. अशा वेळी बहुतेक लोकांचा पहिला पर्याय

CIBIL Score म्हणजे काय? 750+ स्कोर कसा वाढवावा | Free CIBIL Score Check Guide
आजच्या काळात Loan, Credit Card किंवा EMI वर वस्तू खरेदी करणे खूप सामान्य झाले आहे. मात्र अनेक लोकांना एक मोठी समस्या येते — Loan Reject

SIP म्हणजे काय? ₹500 SIP मधून किती पैसे मिळू शकतात? | SIP माहिती मराठीत
आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिक सुरक्षितता हवी असते. मात्र अनेक लोकांना वाटते की गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये लागतात. खरं तर तसे नाही. आज SIP मुळे अगदी

Mutual Fund Investment म्हणजे काय? 2026 मध्ये सुरक्षित आणि स्मार्ट गुंतवणुकीचा संपूर्ण मार्गदर्शक
आजच्या काळात फक्त पैसे कमावणे पुरेसे नाही, तर ते योग्य ठिकाणी गुंतवणेही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. विशेष म्हणजे अनेक लोक आता पारंपरिक बचतीपेक्षा Mutual Fund

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे HRA Rates 2006 ते 202: सहावा व सातवा वेतन आयोगानुसार घरभाडे भत्ता दरांची संपूर्ण माहिती
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये घरभाडे भत्ता (House Rent Allowance – HRA) हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी घरभाड्याचा खर्च मोठा असल्यामुळे
Simply desire to say your article is as amazing. The clarity in your post is simply nice and i can assume you are an expert on this subject. Well with your permission allow me to grab your feed to keep up to date with forthcoming post. Thanks a million and please continue the enjoyable work.