महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अप्रतिम पर्यटन: वणी, हातगड आणि सापुतारा

निसर्ग, अध्यात्म, इतिहास आणि साहस यांचा एकत्र अनुभव

सापुतारा, वणी सप्तश्रृंगी गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अप्रतिम पर्यटन
सापुतारा, वणी सप्तश्रृंगी गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील अप्रतिम पर्यटन स्थळ

आपल्याला निसर्गाचा सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील काही अप्रतिम पर्यटन स्थळांची सफर नक्कीच करायला हवी. आज आपण जाणून घेणार आहोत दिंडोरी, वणी (सप्तश्रृंगी गड), हातगड किल्ला आणि सापुतारा ही ठिकाणं, जी एकाच फेरीत सहज पाहता येतात.

1. वणी – सप्तश्रृंगी गड (Saptashrungi Gad, Vani)

गडावर सप्तश्रृंगी देवीचे प्राचीन मंदिर आहे.
गडावर सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात घेतलेला फोटो

वणी (सप्तश्रृंगी गड) हे हिंदू धर्मातील ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते.

  • गडावर सप्तश्रृंगी देवीचे प्राचीन मंदिर आहे, जे सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे.
  • येथे देवीची ८ हातांची भव्य मूर्ती असून तिच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.
  • गडावर जाण्यासाठी पायऱ्या, रस्ता आणि आता रोपवेचीही सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनामार्फत माफक दरात गडावर जाण्यासाठी रोप वे तयार करण्यात आलेला आहे. रोप वे च्या तिकीटवर एक थ्री डी मूवी दाखविण्यात येते. 
  • पार्किंग च्या परिसरात शंकराची भव्य दिव्य मूर्ती आहे. 

संपूर्ण परिसर सात डोंगररांगांनी वेढलेला असून त्यामुळेच याला ‘सप्तश्रृंगी’ असं नाव पडलं आहे.

सात डोंगररांगांनी वेढलेला असून त्यामुळेच याला ‘सप्तश्रृंगी’ असं नाव पडलं आहे
सप्तश्रुंगी गडावर घेतलेला फोटो.

2. हातगड किल्ला (Hatgad Fort)

सापुताऱ्यापासून फक्त ६ कि.मी. अंतरावर असलेला हातगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे.

  • किल्ल्यावरून सापुताऱ्याचा आणि सह्याद्री पर्वतरांगांचा सुंदर नजारा दिसतो.
  • हातगड किल्ला हे पर्यटन स्थळ महाराष्ट्र गुजरात सीमेवर आहे. 
  • ट्रेकिंगप्रेमींना ही जागा विशेष आवडते. थोडीशी चढण असूनही किल्ला गाठल्यावरचा अनुभव अविस्मरणीय असतो.

पावसाळ्यात येथे निसर्गसौंदर्य अगदी भरात असते.

3. सापुतारा (Saputara)- एक अप्रतिम पर्यटन स्थळ

आय लव सापुतारा - सापुतारा तलावाजवळील फोटो

गुजरातमधील एकमेव हिल स्टेशन – सापुतारा, हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे निसर्ग, साहस, संस्कृती आणि इतिहास यांचा सुरेख संगम आहे.

सापुताऱ्यातील प्रमुख पर्यटन स्थळे:

  • सापुतारा तलाव व गार्डन – नौकाविहारासाठी प्रसिद्ध, तळ्याजवळ सुंदर बाग आणि खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. तलावाजवळील उद्यानात फोटोशूट करून देणारे फोटोग्राफर उपलब्ध आहेत परंतु एका फोटो साठी फोटोग्राफर २० ते ३० रुपये दर सांगतात तुम्हाला यांच्यासोबत बार्गेनिंग करावी लागेल एका डिजिटल soft कॉपी साठी ७ रुपये ते १० रुपये दर वाजवी आहे. या तलावाजवळ नागेश्वर महादेव मंदिर आहे मंदिराजवळ दर्शन घेतल्यानंतर तलावाजवळ शांत वेळ घालवण्यासाठी खूप चांगले ठिकाण (  पूर्ण आनंद घेण्यासाठी मोबाईल मात्र Aeroplane Mode वर ठेवा) 
  • सनसेट पॉईंट (गांधी शिखर) – सह्याद्री पर्वतरांगांचा सुर्यास्त पाहण्याचे ठिकाण. याठिकाणी सूर्यास्तापूर्वी पोहोचणे आवश्यक आहे. याठिकाणी जून महिन्यात ढग तुम्हाला जवळून पाहता येतील.  
  • सनराईज पॉईंट (व्हॅली व्ह्यू) – सकाळच्या कोवळ्या उन्हात मन शांत करणारे दृश्य.
  • पुष्पक रोपवे – डोंगरावरून चालणारा केबल कार जो तलाव, सनसेट पॉईंट आणि हातगडकडे नेतो. या रोप वे मधून संपूर्ण सापुतारा शहराचे दर्शन घडते, पावसाळ्यात हा रोप वे बंद असू शकतो.
  • गिरा धबधबा – सापुताऱ्यापासून ५० किमी अंतरावर, पावसाळ्यात फक्त  जुलै ते सप्टेबर महिन्यात आकर्षक ठरणारा धबधबा.
  • ट्रायबल म्युझियम – डांग आदिवासींचे जीवन आणि संस्कृती यांचे दर्शन घडवते.
  • स्टेप गार्डन, रोज गार्डन – फुलांनी नटलेली उद्याने. या गार्डन मध्ये वेगवेगळ्या जातीची मनमोहक अशी फुलांची झाडे पाहायला मिळतील. फोटो काढण्यासाठी चांगले ठिकाण आहे. 
  • आर्टिस्ट व्हिलेज – वारली चित्रकला व बांबूपासून बनवलेल्या वस्तूंचा खरेदीचा ठिकाण.
  • एकंदरीत सापुतारा हे पर्यटन स्थळ अद्वितीय आहे. 
  • Hotels Booking at Saputara Click Here
सापुतारा गार्डन जवळ फोटोशूट

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत