मराठी निबंध अनुक्रमणिका

गुढीपाडवा
माझा आवडता सण – होळी
जागतिक महिला दिन
मराठी भाषा गौरव दिन
छत्रपती शिवाजी महाराज
कल्पना चावला
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
• नेताजी सुभाष चंद्र बोस
• सावित्रीबाई फुले
• माझी शाळा निबंध मराठी
• माझी उन्हाळातील सुट्टीची मजा
• विज्ञान शाप की वरदान
• जल हेच जीवन निबंध मराठी
• माझी आई निबंध मराठी
• 1 मे महाराष्ट्र दिन माहिती मराठी
• माझा आवडता ऋतू पावसाळा
• माझा आवडता ऋतू हिवाळा
• माझा आवडता ऋतू उन्हाळा
• माझा आवडता खेळ क्रिकेट
• माझा आवडता खेळ फुटबॉल
• माझा आवडता खेळ कबड्डी
• प्रदूषण एक समस्या
• गुरु पौर्णिमा निबंध मराठी
• शाळेचा पहिला दिवस
• माझा आवडता पक्षी मोर
• माझे आवडते शिक्षक
• आंतरराष्ट्रीय योग दिवस
• दिवाळी निबंध मराठी
• महात्मा गांधी निबंध मराठी
• मला पडलेले स्वप्न
• फिल्ड मार्शल सॅम बहादूर
• श्री चक्रधर स्वामी
• गणेश उत्सव
• वेळेचे महत्व
• दसरा

जागतिक महिला दिन – मराठी निबंध

जागतिक महिला दिन ८ मार्चच्या निमित्ताने महिला सन्मान करणारी चित्रमय रचना

महिला दिन

प्रस्तावना:
दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या संघर्ष, योगदान आणि सन्मानासाठी समर्पित आहे. जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना विशेष सन्मान देवून सत्कार करण्यात येतो. 

महिला दिन का महत्त्व:
या दिवशी जगभरात महिलांच्या हक्कांची जाणीव करून दिली जाते. त्यांच्या यशाचे कौतुक केले जाते. अनेक संस्था महिला सशक्तीकरणासाठी कार्यक्रम आयोजित करतात.

महिला दिनाचा इतिहास:
१९०८ मध्ये अमेरिकेत महिलांनी समान हक्कांसाठी मोर्चा काढला. त्यानंतर १९१० मध्ये कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत महिला दिनाची संकल्पना मांडली गेली. अखेर १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला.

महिलांचे समाजातील योगदान:
महिला घराची आधारस्तंभ असते. त्या शिक्षण, विज्ञान, राजकारण, संरक्षण, खेळ यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरल्या आहेत. कल्पना चावला, लता मंगेशकर, किरण बेदी यांसारख्या महिलांनी देशाचे नाव उज्वल केले.

सध्याचे महिलांचे प्रश्न:
आजही अनेक महिलांना शिक्षण, आरोग्य व सुरक्षितता यासारख्या मूलभूत गोष्टींपासून वंचित रहावे लागते. बालविवाह, घरगुती हिंसाचार, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या समस्याही अजून अस्तित्वात आहेत.

महिला सबलीकरणाचे उपाय:
महिलांना शिक्षणाची संधी देणे, स्वावलंबी बनवणे, सरकारी योजनांचा लाभ पोहोचवणे गरजेचे आहे. तसेच समाजात समानता व आदराची भावना निर्माण झाली पाहिजे.

महिला दिन – निष्कर्ष:
महिला दिन म्हणजे महिला सन्मानाचा, त्यांच्यावरील प्रेमाचा आणि संघर्षाच्या प्रेरणेचा दिवस. आपल्याला प्रत्येक दिवशी महिला सन्मानित वाटाव्यात, असे प्रयत्न झाले पाहिजेत.