राज्य गट विमा योजना 1982 – शासकीय कर्मचारी लाभ सर्व GR

राज्य गट विमा योजना 1982 ही महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची सुरक्षा योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण देणे हा आहे. जर कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावला, तर त्यांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळते. याशिवाय, कर्मचारी राजीनामा देतो, सेवानिवृत्त होतो किंवा इतर कारणामुळे सेवा संपते, तेव्हाही ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे, ही योजना दुहेरी लाभ देणारी ठरते. एकीकडे विमा संरक्षण मिळते, तर दुसरीकडे बचतीचा फायदा देखील मिळतो. परिणामी, कर्मचाऱ्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित होते. म्हणूनच, ही योजना प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक मानली जाते. राज्य शासन अत्यंत कमी खर्चाची व सर्वस्वी वर्गणीच्या स्वरुपाची अशी हि स्वावलंबी योजना आहे.   राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना १ मे १९८२ पासून सुरू करण्यात आली आहे.  प्रस्तुत योजनेंचा तपशील वेगळ्या जोडपत्रात दिलेला आहे. ही योजना स्थायी राहील.

नामनिर्देशन

राज्य शासकीय गट विमा योजनेच्या लाभासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला नामनिर्देशन करणे आवश्यक राहील. गट विमा योजनेचे नामनिर्देशन करण्यासाठी नमुना form खालीलप्रमाणे आहे. हा नमुना भरून व स्वाक्षरी करून कार्यालय प्रमुखामार्फत आपल्या सेवा पुस्तकात नोंद करणे आवश्यक आहे.

गट विमा योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेला नामनिर्देशनाचा form

गट विमा योजना १९८२ चा नामनिर्देशनाचा नमुना PDF स्वरूपात download करण्यासाठी येथे क्लिक करा

२६ एप्रिल १९८२ च्या शासन निर्णया  नुसारगट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय

१) शासन निर्णय दिनांक २६ एप्रिल १९८२ नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना १९८२ हि १ मे १९८२ पासून आमलात आली. यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते.

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये
वर्ग – १ (अ) ८० रुपये ८००००
वर्ग – २ (ब) ४० रुपये ४००००
वर्ग – ३ (क) २० रुपये २००००
वर्ग – ४ (ड) १० रुपये १००००

शासन निर्णय दिनांक १४   फेब्रुवारी १९९० नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय

२) शासन निर्णय दिनांक १४   फेब्रुवारी १९९०  नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना  यावेळी वर्गणीचे दर खालील प्रमाणे होते. सदर वर्गणीचे वाढीव दर १ जानेवारी १९९० पासून लागू करण्यात आले आहेत.

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये
वर्ग – १ (अ) १२० रुपये १२००००
वर्ग – २ (ब) ६० रुपये ६००००
वर्ग – ३ (क) ३० रुपये ३००००
वर्ग – ४ (ड) १५  रुपये १५०००

३) शासन निर्णय दिनांक २६ जुलै २००२  नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर खालील प्रमाणे. सदर दर 1 जानेवारी २००२ पासून लागू राहतील.

वर्ग वर्गणीचे दर विमा स्वंरक्षण  रुपये
वर्ग – १ (अ) २४० रुपये २४००००
वर्ग – २ (ब) १२० रुपये १२००००
वर्ग – ३ (क) ६०रुपये ६००००
वर्ग – ४ (ड) ३० रुपये ३००००

४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१०   नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर  खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १  जानेवारी  २०१०  पासून लागू राहतील.  शासन निर्णय ०२ ऑगस्ट २०१० रोजी निघाला असला तरी सुधारित दर 1 जानेवारी २०१० पासून लागू करण्यात आलेले आहेत. जानेवारी ते जुलै २०१० च्या गटविमा वर्गणीच्या फरकाची रक्कम ऑगस्ट २०१० च्या वेतनात वसूल करण्याचे आदेश आहेत.

वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये
वर्ग – १ (अ) ४८० रुपये ४८००००
वर्ग – २ (ब) २४० रुपये २४००००
वर्ग – ३ (क) १२० रुपये १२००००
वर्ग – ४ (ड) ६० रुपये ६००००

३० जानेवारी २०१६ नुसार गट विमा योजना संदर्भात वर्गणीतील बदल झालेले शासन निर्णय

५) शासन निर्णय –  गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६    नुसार – राज्य शासकींय कर्मचारी गट विमा योजना वर्गणीचे दर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्या नंतर  खालील प्रमाणे. सदर दर दिनांक १  जानेवारी  २०१६  पासून लागू करण्यात आले आहेत.

गट विमा योजना वर्गणी वाढ झाल्याचा शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०१६
गट विमा योजना शासन निर्णय ३० जानेवारी २०१६
वर्ग वर्गणीचे दर विमा संरक्षण रुपये
वर्ग – ३ (क) ३६० रुपये ३६००००
वर्ग – ४ (ड) २४० रुपये २४००००

गट विमा योजना 1982 विविध फायदे

राज्य शासकींय गट विमा योजना चे सर्व शासन निर्णय खालीलप्रमाणे

Download करण्यासाठी खाली क्लिक करा

गट विमा योजना नामनिर्देशनाचा नमुना form download करण्यासाठी येथे क्लिक करा

१) शासन निर्णय  गट विमा योजना दिनांक २६ एप्रिल १९८२

२) शासन निर्णय गट विमा योजना  दिनांक १४   फेब्रुवारी १९९०

३) शासन निर्णय गट विमा योजना दिनांक २६ जुलै २००२

४) शासन निर्णय गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ०२ ऑगस्ट २०१० 

५) शासन निर्णय –  गट विमा योजनेच्या वर्गणीत वाढ करणे बाबत दिनांक ३० जानेवारी २०१६ 

  1. रजा नियम–सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शक – 2025 – रजा नियम वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
  2. प्रोत्साहन भत्ता नियम व विविध शासन निर्णय वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत